गेले काही दिवसापासून एकनाथ खंडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असताना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहेत. जर मोदींच्या नेत्रत्वावर विश्वास ठेऊन कोणी प्रवेश करत असतील तर आमही त्यांच स्वागतच करू अशी प्रतिक्रिया माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आम्हाला अधिकृत रित्या कोणतीही माहिती पक्षाकडून आलेली नाही आस देखील त्यांनी सांगितल.
एकनाथ खंडसे यांनी गेले 40 वर्ष भाजपा मध्ये काम केल आहे भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांच योगदान खूप मोठ आहे. जूने जाणते नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब प्रमोद महाजन यांच्यासारख्या बड्या नेटयांसोबत त्यांचे जीवालयाचे संबंध होते.तसेच महाराष्ट्रात भाजपा पक्ष वाढवण्यात खंडसेंचा मोठा वाट आहे. तसेच दिल्लीमध्ये देखील त्यांचे नेत्यांशी चांगले संबंध आहेत. जर त्यांच्या प्रवेशामुळे भाजपा अजून मजबूत होण्याची शक्यता आहे.
तसेच त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नारंजीनाट्य पाहायला मिळत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाला चांगले यश येऊ शकते. अशी काही राजकीय अंदाज बांधला जातोय. रावेर मधून एकनाथ खंडसेंच्या सून बाई रक्षा खंडसे लोकसभेच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यामुळे त्यांचा मार्ग सुखर होण्याची शक्यता आहे.