लोकसभेचे उद्धव ठाकरे गटाचे उ मेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना कोरोंना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी आज ED कडून समन्स बजावण्यात आला होता.
गेल्या सप्टेंबेर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सगळ्याचा तपास ईडिकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवरतीय सूरज चव्हाण याची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याच संदर्भात आज त्याची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मध्यमानशी संवाद साधला.
आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना अटकेची टांगती तलवार दिसून येत आहे.यावेळी अमोल कीर्तिकर म्हणाले माझ्याकडून कोणताही गुन्हा झाला नाही मी पूर्णपणे चौकशीला सहकार्य करत आहे. तसेच काहीही झळ तरी उद्धव साहेब आदित्य साहेब यांची साथ सोडणार नाही अस त्यांनी म्हटल आहे.
जस जशी निवडणूक तोंडावर येत आहे तसतसे वातावरण गरम हॉट चालले आहे यावेळी वायव्य मुंबईतला खासदार कोण होणार महायुतीतून कोण उमेदवार असणार ही अजून समजल नाही.