आता लोकसभेच पडघम वाजले आहे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे सर्व पक्षाच्या नेत्यांच प्रयत्न आहेत यातच काही ठिकाणी जागेवरून नाराजीनाट्य बघायला मिळत आहे.
त्यातच सांगली लोकसभेच्या जागेबादडल सांगली मतदारसंघ हा कॉंग्रेस कहा परंपरागत कॉँग्रेससचा मतदारसंघ असून देखील त्यातच या मतदार संघात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील याच्या घरच वर्चस्व राहिलेल आहे कायम हा मतदार संघपाठीमागील दोन खासदारकी टर्म सोडली तर पाठीमागे कॉँग्रेसचा खासदार राहीला आहे अशातच 2024 च्या निवडणुकीत हा मतदार संघ कॉंग्रेसला येईल अस वाटत होत पण इथे उद्धव ठाकरे गटनि आपला उमेदवार जाहीर केला आहे
पण अशातच गेले काही दिवसापासून या ठिकाणी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आपली जोरदार तयारी केली असताना त्यांना ही उमेदवारी कॉंग्रेसकडून जाहीर होणार अस असताना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केला आहे.
पण याबादल सांगलीतील नेते उपवाद वगळता इतर महाराष्ट्रातील कोणतेही नेते बोलायला तयार नाहीत.कारण वसंततदादा घरण्याचा या मतदार संघात मोठ योगदान आहे. अशातच ही उमेदवारी त्याच्या घराण्यातील व्यक्तीला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे.
ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाहीर झाल्यानंतर सांगलीतील नेत्यानी दिल्ली मध्ये कॉँग्रेससचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खरगे यांना भेटले. तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना देखील भेटले पण याबद्दल कोणताही तोडगा त्यांच्याकडून काढण्यात आला नाही. याबद्दल सामान्य कार्यकर्त्यांच्या भवन दुखावल्या गेल्या आहेत.
तसेच या मतदार संघात उद्धव ठाकरे गटाच कोणताही प्राबल्य नसताना ही जागा त्यांना देण्यात आली आहे. यावरून वसंतदादा पाटील याच्या घरण्याच नुकसान करण्याच किंवा त्यांच खच्चीकरण करण्याचा डाव दिसून येत आहे अस सांगलीतील नेत्यांच म्हणणं आहे.पण विशाल पाटील ही लढण्यास तयार आहेत ते बंडखोरी करतात का अजून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी भेटते हे पाहाव लागेल.